Pan Card पॅन कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. पॅन कार्ड "Permanent Account Number" हे प्राप्तीकर विभागाने जारी केलेले दहा अंकी अक्षरांक ओळख आहे. पॅन कार्डचा वापर बँकेत नवीन खाते उघडणे, आर्थिक व्यवहार, ओळखीचा पुरावा, कंपनी नोंदणी, आयकर भरणे, सरकारी योजना व इतर व्यावहारिक कामाकाजात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
दिनांक : १ एप्रिल २०२६ पासुन नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी ओळखीच्या पुरावासोबत जन्म तारिखेचा पुरावा सादर करावा लागणार आहे. म्हणजेच, आधार कार्ड सोबत आता जन्माचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रचना : पॅन कार्डची रचना खूपच मनोरंजक आहे. पॅन कार्डचा प्रत्येक घटकाचा किंवा अक्षराचा अर्थ खालीलप्रमाणे दिलेला आहे.
१. पॅन कार्पडचे पहिली तीन अक्षरे हि AAA ते ZZZ पर्यंतच्या अक्षरांची एक मालिका आहे.
२. पॅन कार्डचे चौथे अक्षर तुम्ही कोणत्या प्रकारचे करदाते आहेत हे दर्शवते. खालील आद्यक्षरानुसार तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात त्याची ओळख करु शकतात.
● A : Association of Persons AOP (व्यक्तींचा समूह)
● B : Body of Individuals BOI (व्यक्तींचा समूह)
● C : Company (कंपनी)
● F : Firm/Limited Liability Partnership (फर्म/मर्यादित दायित्व भागीदारी)
● G : Government Agency (सरकारी संस्था)
● H : Hindu Undivided Family HUF (हिंदू अविभक्त कुटुंब)
● L : Local Authority (स्थानिक प्राधिकरण)
● J : Artificial Judicial Person (कृत्रिम न्यायिक व्यक्ती)
● P : Individual (व्यक्ती)
● T : Trust (सेवाभावी संस्था)
३. पॅन कार्डचे पाचवे अक्षर हे तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर असते. त्यामुळे, उदा. जर एखाद्या व्यक्तीचे नाव "महेंद्रसिंग धोनी" असेल तर त्यांच्या पॅनचे पाचवे 'D' असेल. म्हणजेच आडनावाचे पहिले अक्षर हे पॅन कार्डवर पाचव्या स्थानी राहील.
४. पॅन कार्डचे सहावे ते नववे अक्षर हे ०००१ ते ९९९९ या अंकाच्या क्रमातून घेण्यात येतात.
५. पॅन कार्डचे शेवटचे अक्षर हे एक अक्षर तपासणी आहे.
प्रकार : पॅन कार्ड वेगवेगळ्या कर भरणाऱ्या संस्थाना किंवा व्यक्तींना जारी केले जातात. त्यानुसार पॅन कार्डचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
● Pan Card (Form No - 93) for Indian Individuals (भारतीय नागरिक)
● Pan Card (Form No - 94)for Indian Entity (भारतीय कंपनी)
● Pan Card (Form No - 95)for Foreign Citizens (परदेशी नागरिक)
● Pan Card (Form No - 96) Foreign Entity (परदेशी कंपनी)
विशेष : व्यक्तींना जारी केलेल्या किंवा वितरण केलेल्या पॅन कार्डवर व्यक्तीचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव (आडनावासह) किंवा पूर्ण नाव, जन्म तारिख, सही/अंगठा, व्यक्तीचा फोटो, पॅन क्रमांक, होलोग्राम, क्यूआर सांकेतांक असते.
तसेच, कंपन्यांना जारी केलेल्या पॅन कार्डवर कंपनीचे नाव, नोंदणी तारिख, पॅन क्रमांक, होलोग्राम, क्यूआर सांकेतांक, पॅन कार्ड जारी केल्याची तारिख असते. कंपनीच्या पॅन कार्ड वर सही/अंगठा किंवा फोटो नसते.
कागदपत्रे : दिनांक : १ एप्रिल २०२६ पासून आधार कार्ड सोबत आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून एक पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाली दिलेल्या कागदपत्रांपैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
● वाहन चालक परवाना (Driving License)
● दहावी प्रमाणपत्र (Matriculation Certificate)
● पासपोर्ट (Passport)
● जन्म दाखला (Birth Certificate)
● निवृत्तीवेतन प्रदान आदेश (Pension Payment Order)
● विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate)
● प्रतिज्ञापत्र (Affidavite)
● अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
● दहावी गुणपत्रक (Matriculation Marksheet)
● मतदान कार्ड (Voter Card)
● केंद्र शासनाचे आरोग्य योजना कार्ड (Central Government Health Scheme Card)
● केंद्र शासनाने जारी केलेले कार्ड फोटोसहित (Photo Idnetity Card Issued by Central Government or State Government or Public Sector Undertaking)
● माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना कार्ड (Ex-Servicemen Contributory Health Scheme Photo Card)