MahaDBT Scholarship : Post Matric Scholarship Scheme Registration, MahaDBT Login, Beneficiary Status, Redeem, Terms and Condition, Declaration Download PDF...

Mahendra Vasave
0


Maha-DBT-Scholarship

MahaDBT Scholarship

MahaDBT : महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क, शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्याकरिता किंवा लाभ वितरण करण्यासाठी स्वातंत्र्य व्यासपीठ आहे.


महा-डीबीटी विविध सरकारी विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग व उच्चशिक्षण संचनालय यांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.


१. उद्देश : महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्ग यांना आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती थेट त्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात महा-डीबीटी मार्फत जमा करण्यात येते, ज्यांच्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता येते.


२. योजना : महा-डीबीटी पोर्टलवर अनेक योजना उपलब्ध आहेत ज्यात प्रामुख्याने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना, छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती अशा अनेक योजना एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


३. पात्रता : सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग व उच्च शिक्षण संचनालय यांच्यामार्फत शिष्यवृत्ती योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे-


 भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 

 महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा. 

 भौतिक योजना साठी योजनेसाठी कुवार कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत. 

 काही विशिष्ट शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेचे निकष ७५% च्या वर लागू असतात. 

 एका कुटुंबातील दोनच मुले व योजनेत या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात तसे हमीपत्र सादर करणे आवश्यक.


४. कागदपत्रे : महा - डीबीटी संकेतस्थळावर उपलब्ध सर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.


● आधार कार्ड.

 अधिवास दाखला.

● उत्पन्न दाखला.

● जातीचा दाखला.

● मागील परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक.

● प्रवेश पावती किंवा बोनाफाईड.

● प्रतिज्ञापत्र (गॅप असल्यास).

● पासबुक.

● एसएससी गुणपत्रक.

● एचएससी गुणपत्रक.


५. अर्ज प्रक्रिया : महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ व सुरक्षित करण्यात आले, असून महत्त्वपूर्ण टप्पे खालील प्रमाणे-


 नवीन नोंदणी : अधिकृत महा-डीबीटी संकेतस्थळाला भेट देऊन नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करा.


 आधार पडताळणी : ओटीपी वन टाइम पासवर्ड पडताळणी द्वारे स्वयंचलित प्रोफाइल तपशील मिळवण्यासाठी तुमचा आधार क्रमांक वापरून नोंदणी करा किंवा जर तुमच्याकडे आधार नसेल तर तुम्ही ओळखपत्र देऊन करु शकता.


 प्रोफाईल निर्मिती : तुम्ही तयार केलेल्या वापरकर्ता ओळख आणि पासवर्ड ने लॉगिन करा आणि वैयक्तिक माहिती, पत्ता, इतर माहिती, पात्रता आणि वस्तीग्रह तपशील भरून तुमचे प्रोफाईल पूर्ण करा.


 योजना निवड : सर्व योजना विभागांतर्गत पोर्टल तुमच्या प्रोफाईल माहितीच्या आधारे तुम्ही पात्र असलेले शिष्यवृत्ती प्रदर्शित करेल.


 अर्ज सादर  करणे : संबंधित योजना निवडा व विशिष्ट अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करा.


६. शेवटची तारीख : शैक्षणिक वर्ष बहुतेक योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात येते. त्यास मुदतवाढ देणे किंवा बदल करणे संबंधी शिष्यवृत्ती विभागाच्या अधिनस्त राहील तसेच अटी व शर्ती बंधनकारक राहील. Maha DBT Scholarship


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !