प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने दिनांक : १ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली. दिनांक : २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पीएम - किसान सम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता उत्तर प्रदेश येथून माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. एका वर्षात तीन टप्प्यात दोन हजार रुपये प्रमाणे लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत वर्ग केले जातात.
● प्रसिद्धी : 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना' कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्र शासनामार्फत राबवण्यात येते. सर्व शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून, शासन स्तरावर शेतकऱ्यांना योजनेची माहिती व्हावी यासाठी जाहिराती, शेती शाळा, चलचित्र बातम्या, वर्तमानपत्र, आकाशवाणी प्रसारण, सामाजिक माध्यम, फलक अशा अनेक माध्यमांचा वापर केला जातो.
● अर्थसहाय्य : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ही १००% केंद्र शासनाची योजना असून, योजनेस भारत सरकारचे १००% अर्थसहाय्य आहे. "प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना" व "नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" पात्र आणि अपात्र मापदंड ठरलेले आहेत. त्यासाठी आवश्यक शर्ती व अटी पूर्ण केलेले शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल. आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाही.
● सनियंत्रण : पीएम - किसान सम्मान निधी योजनेचा निधी वितरित करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, आणि राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
● कार्यपद्धती : योजनेचे हप्ते वितरित करण्याचा कालावधी दर चार महिन्यांनी रुपये २०००/- असे एकूण रुपये ६०००/- एका वर्षात तीन टप्यात शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत वर्ग करण्यात येतात.
● कागदपत्रे : पीएम - किसान योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना नवीन नोंदणी किंवा माहिती अद्ययावत करण्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
१. आधार कार्ड
२. बँक खाते पुस्तक
३.सातबारा किंवा वनपट्ट्यांना
४. नाहरकत प्रमाणपत्र.
टीप : पीएम - किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खाते व आधार कार्ड भ्रमणध्वनी क्रमांक लिंक असणे आवश्यक.
● पात्रता : "प्रधानमंत्री किसान सम्मान निधी" योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्र शासना मार्फत अधिसूचित केलेली पात्रता खलीलप्रमाणे-
१. भारतीय शेतकरी कुटुंबातील कुटुंब पमुख व १८ वर्षावरील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो.
२. लाभार्थी व्यक्तीचे नावे जमीन असणे किंवा सामायिक जमीन असल्यास ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक.
३. या योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण असल्याने लाभार्थ्याकडे आधार लिंक बँक खाते असणे बंधनकारक राहील.
४. आधार आणि भ्रमणध्वनी क्रमांक लिंक असणे आवश्यक आणि पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे तसेच लाभार्थ्यांची अध्यायावत माहिती देणे बंधनकारक राहील.
५. कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणे बंधनकारक राहील.
● अपात्रता : प्रधानमंत्री किसान संबंधित योजना कृषी व शेतकरी कल्याण विभाग कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून अधिसूचित केलेली अपात्रता व अटी शर्ती खालील प्रमाणे.
१. सर्व संस्थात्मक जमीनधारक व संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी व माजी व्यक्ती.
२. आजी व माजी लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, आजी व माजी विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य, आजी व माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी व माजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
३. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत किंवा निवृत्ती अधिकारी किंवा कर्मचारी.
४. शासन अधिकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारतील कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थांच्या सर्व अधिकारी किंवा कर्मचारी. (चतुर्थ श्रेणी किंवा गट "ड" वर्ग कर्मचारी वगळून)
५. सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती यांचे मासिक वेतन निवृत्तीवेतन रुपये १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी किंवा गट "ड" वर्ग कर्मचारी वगळून)
६. मागील वर्षात आयकर भरलेले सर्व व्यक्ती.
७. नोंदणीकृत व्यवसायिक, चिकित्सक, वकील, सनदी लेखापाल, अभियंता, वास्तुशास्त्र इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती. PM-Kisan Samman Nidhi Yojana

