CTET : Central Teacher Eligibility Test Examination Registration, Application Form, Confirmation Page, Information Bulletin

Mahendra Vasave
0

CTET Central Teacher Eligibility Test


केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा

CTET : प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली द्वारा आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षकांची नोकरी मिळवण्याकरिता संपूर्ण देशभर ग्राह्य धरली जाते.

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली, द्वारा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येते. प्रत्येक वेळी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येते, व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात.

● ग्राह्य संस्था : सी. टी. ई. टी. केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय समिती, केंद्रीय तिबेटियन विद्यालय व केंद्रशासित प्रदेश (चंदिगड, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी व एनसीपी दिल्ली आणि इतर शाळांमध्ये येणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा व राज्य सरकारच्या अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा) इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी ग्राह्य धरली जाते.

● पात्रता : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेस बसण्याकरिता शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे-

१. प्राथमिक शिक्षक पदासाठी (इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी) किमान इयत्ता बारावी ५०% गुणासह उत्तीर्ण आणि ५०% गुणासह एक किंवा दोन वर्षे कालावधीची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदविका किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

२. माध्यमिक शिक्षक पदासाठी (इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी) पदवी किमान ५०% गुणासह उत्तीर्ण किंवा एक किंवा दोन वर्षे कालावधीची पदवी किमान ५०% गुणासह उत्तीर्ण आवश्यक राहील. तसेच पदविका किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

३. प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व अपंग उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत ५% गुणाची सूट राहील. 

● भाषा माध्यम : "सेन्ट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट" साठी उमेदवारांना २० भाषांपैकी २ भाषांची निवड करणे. (जसे की, मराठी - इंग्रजी) सी. टी. ई. टी. प्रश्नपत्रिका संच उमेदवारांच्या भाषा निवडीनुसार परीक्षेच्या वेळी देण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःला सोयीस्कर राहील, अशा भाषांची निवड करावी. मान्यता प्राप्त भाषा  व भाषा सांकेतांक पुढीलप्रमाणे- 

१. इंग्रजी - ०१
२. हिंदी - ०२
३. आसामी - ०३ 
४. बंगाली - ०४
५. गारो - ०५
६. गुजराती - ०६
७. कन्नड - ०७
८. खासी - ०८
९. मल्याळम - ०९
१०. मणिपुरी - १०
११. मराठी - ११
१२. मिझो - १२
१३. नेपाळी - १३
१४. ओडिया - १४
१५. पंजाबी - १५
१६. संस्कृत - १६
१७. तमिळ - १७
१८. तेलगू - १८
१९. तिबेटियन - १९
२०. उर्दू - २०

● परीक्षा केंद्रे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली द्वारा सीटीटीची परीक्षा आयोजित करण्यासाठी भारतातील एकूण १३२ परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. उमेदवारांनी स्वतःला सोयीस्कर पडेल, असे ४ केंद्र निवडायचे आहेत. अधिकृत परीक्षा केंद्र सांकेतांक व परीक्षा केंद्र पुढीलपमाणे-

अंदमान निकोबार : पोर्ट ब्लेअर (१०१). आंध्र प्रदेश : गुंटूर (१०२), तिरुपती (१०३), विजयवाडा (१०४), विशाखापट्टणम (१०५). अरुणाचल प्रदेश : इटानगर (१०६). आसाम : दिब्रुगड (१०७), गुवाहाटी (१०८), सिलचर (१०९).

बिहार : बेगूसराई (११०), भागलपुर (१११), भोजपुर (इरा) (१२), दरभंगा (११३), गया (११४), गोपालगंज (१५), मधुबनी (११६), मुजफ्फरपुर (११७), नालंदा (११८), पटना (११९), पूर्णिया (१२०), रोहतास (१२१), सहरस (१२२), समस्तीपुर (१२३), सारन (१२४), वैशाली (हाजीपुर) (१२५).

चंदिगड : चंदिगड (१२६). छत्तीसगड : भिलाई / दुर्ग (१२७), बिलासपूर (१२८), रायपूर (१२९). दादरा आणि नगर हवेली : दादरा आणि नगर हवेली (१३०). दमण आणि दीव : दमण (१३१). दिल्ली : दिल्ली (१३२). गोवा : पणजी (१३७). गुजरात : अहमदाबाद (१३८), राजकोट (१३९ ), सुरत (१४०), वडोदरा (१४१).

हरयाणा : अंबाला (१४२), फरीदाबाद (१४३), गुरुग्राम (१४४), हिस्सार (१४५), कर्नल (१४६), कुरुक्षेत्र (१४७)हिमाचल प्रदेश : हमीरपुर (१४८), कांगरा (१४९), शिमला (१५०). जम्मू आणि कश्मीर : जम्मू (१५१), श्रीनगर (१५२). झारखंड : बोकारो (१५३), धनबाद (१५४), हजारीबाग (१५५), जमशेदपूर (१५६), रांची (१५७).

कर्नाटक : बंगळूरु (१५८), हुबळी (१५९). केरळ : ऐरनाकुलम (१६०), कोझिकोड (१६१), थिरुवनंतपुरम (१६२). लद्दाख : लेह (१६३), कारगिल (१६४). लक्षद्वीप: कवरत्ती (१६५). मध्य प्रदेश : भोपाळ (१६६), ग्वालियर (१६७), इंदोर (१६८), जबलपूर (१६९).

महाराष्ट्र : अमरावती (१७०), संभाजीनगर (औरंगाबाद) (१७१), मुंबई (१७२), नागपूर (१७३), नाशिक (१७४), पुणे (१७५), सोलापूर (१७६). मणिपूर : इंफाळ (१७७). मेघालय : शिलाँग (१७८). मिझोरम : ऐजवाल (१७९). नागालँड : कोहिमा (१८०). ओडिसा : भुवनेश्वर (१८१), संबलपूर (१८२). पुद्दुचेरी : पुद्दुचेरी (१८३). 

पंजाब : अमृतसर (१८४), भटिंडा (१८५), जालंधर (१८६). राजस्थान : अजमेर (१८७), अलवर (१८८), बिकानेर (१८९), जयपुर (१९०), जोधपुर (१९१), कोटा (१९२), उदयपूर (१९३). सिक्कीम : गंगटोक (१९४). तमिळनाडू : चेन्नई (१९५), कोईमतत्तुर (१९६), मदुराई (१९७). तेलंगाना : हैदराबाद (१९८), वारंगल (१९९). त्रिपुरा : आगरतळा (२००).

उत्तर प्रदेश : आग्रा (२०१), अलीगढ (२०२), आंबेडकर नगर (२०३), अयोध्या (फैजाबाद) (२०४), बरेली (२०५), बिजनोर (२०६), देवरीया (२०७), ईटवाह (२०८), गाजियाबाद (२०९), गाझिपुर (२१०), गोंडा (२११), गोरखपूर (२१२ ), जौनपुर (२१३), झांशी (२१४),कानपूर (२१५), लखनऊ (२१६), मैनपुरी (२१७), मथुरा (२१८), मऊ (२१९), मिरत (२२०), मोरादाबाद (२२१), नोएडा / ग्रेटर नोएडा (२२२), प्रतापगढ (२२३), प्रयागराज (अलाहाबाद) (२२४), रायबरेली (२२५), सहारनपुर (२२६), शहाजंहानपूर (२२७), सितापुर (२२८), सुलतानपूर (२२९), वाराणसी (२२३).

उत्तराखंड : डेहराडून (२३१), हल्दवानी (२३२), हरिद्वार (२३३), उदमसिंह नगर (२३४). पश्चिम बंगाल : कोलकाता (२३५), सिलीगुरी (२३६). 

● परीक्षा शुल्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली द्वारा आयोजित सी. टी. ई. टी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे. 

१. खुला व इतर मागासवर्ग फक्त एका पेपरसाठी रुपये १०००/- आणि दोन्ही पेपरसाठी रुपये १२००/-

२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग एका पेपरसाठी ५००/- आणि दोन्ही पेपरसाठी रुपये ६००/-

● अर्ज प्रक्रिया : CTET Examination ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता खालील पायऱ्या फॉलो करा.

१. सी. टी. ई. टी. च्या अधिकृत संकेतस्थळ www ctet.nic.in वर लॉग ऑन करा. 

२. अप्लाई ऑनलाईन पर्याय निवडा व चेक बॉक्स वर क्लिक करून नोंदणी करा. 

३. नोंदणी करण्याकरिता उमेदवारांची वैयक्तिक माहिती, नाव, ई - मेल, भ्रमणध्वनी क्रमांक भरावा. पासवर्ड तयार करून सबमिट बटनावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक लिहून घ्या किंवा सेव करा. 

४. नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करा. 

५. उमेदवारांची वैयक्तिक, माहिती शैक्षणिक पात्रता, परीक्षा प्रश्नपत्रिका संच, भाषा माध्यम, परीक्षा केंद्र निवडा.

६. नजीकच्या काळातील उमेदवाराचे छायाचित्र ५० केबी पर्यंत व सही २० केबी पर्यंत जेपीजी फॉरमॅट (JPG)मध्ये उपलोड करा.

७. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआयच्या सहाय्याने परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा. 

८. वरील टप्पे पूर्ण झाल्यानंतर पुष्टीकरण पृष्ठ (Conforamation Page) भविष्यातील कामासाठी काढून ठेवावी.

● परीक्षा पद्धत : सीटीईटी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे वस्तूनिष्ट प्रश्न (MCQ - Multiple Choice Questions) आणि उत्तरपत्रिका प्रकाशसंवेदी चिन्ह ओळख (OMR - Optical Mark Recognaition Sheet) प्रमाणे असतील. 

● परीक्षा स्वरूप : सीटीईटी परीक्षा स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. पेपर - १ व पेपर - २ करिता पाच घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत. 

१. पेपर - I  : बालविकास व अध्यापनशास्र, गणित, पर्यावरणीय अभ्यास, भाषा - १ व भाषा - २ अनिवार्य अशा पाच घटकावर प्रत्येकी ३० प्रश्न ३० मार्क असे एकूण १५० प्रश्न १५० मार्क याप्रमाणे पेपर एकसाठी प्रश्नपत्रिका स्वरूप असणार आहेत. 

२. पेपर - II : बालविकास व अध्यापनशास्र, भाषा - १ व भाषा - २ अनिवार्य प्रत्येकी ३० प्रश्न ३० मार्क आणि गणित व विज्ञान अनिवार्य (गणित व विज्ञान शिक्षिकाकरिता) किंवा सामाजिकशास्र अनिवार्य (सामाजिक अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र शिक्षकांकरिता) ६० प्रश्न ६० मार्क असे एकूण १५० प्रश्न १५० मार्क याप्रमाणे पेपर दोनसाठी प्रश्नपत्रिका चे स्वरूप असणार आहेत. 

● सराव चाचणी : सराव चाचणीमुळे स्वतः ची परीक्षा विषयक मानसिक तयारी, वास्तविक क्षमता, सज्जता, नवीनतम अभ्यासक्रमाची माहिती, परीक्षा शैलीची ओळख, प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव सराव पेपर किंवा चाचणीमुळे उमेदवारांना होतो. 

"सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट" च्या संबधित परीक्षेच्या नवीनतम परीक्षेची रचना आणि अभ्यासक्रमावर आधारित प्रत्यक्ष परीक्षेच्या अनुकरण सराव चाचणीमुळे होतो.

● प्रवेशपत्र :  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम परीक्षा केंद्र व परीक्षा शहर जाहीर करण्यात येतात, व परीक्षा प्रवेशपत्र प्रत्यक्ष परीक्षेच्या चार-पाच दिवस अगोदर सी. टी. ई. टी. च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतात.

 टीप : कालांतराने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, सामाजिक आरक्षण, भाषा माध्यम, प्रश्नपत्रिका संच, परिक्षा शुल्क, परीक्षा केंद्र निवड प्रक्रिया व उल्लेख नसलेल्या माहितीत बदल शक्य. Central TET Information Bulletin
 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !